कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कापूस बियाण्याचे वितरण
भोकर: (संदिप गंगासागरे) केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील धावरी बू. ता. भोकर येथील नोंदणीकृत शेतकरी गटांची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी गटांना नुकतेच अधिकृत कापूस बियाणे बॅग आणि तांत्रिक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. दिलीप जाधव, मंडळ कृषि अधिकारी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी टोंपे साहेब,उप कृषी अधिकारी श्री. रवी तांडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री. चंद्रशेखर इरलेवाड यांनी आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर प्रकाश टाकला. अधिकारी वर्गाचे प्रमुख मार्गदर्शन: आधुनिक पद्धतींचा वापर: सघन कापूस लागवड (HDPS) पद्धतीचा अवलंब करून मर्यादित क्षेत्रात जास्त आणि दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे, याचे प्रात्यक्षिक समजावून सांगण्यात आले. स्वच्छ कापूस वेचणी: कापसाची प्रत उत्तम राखण्यासाठी आणि बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष वेचणी पिशव्यांचा (Picking Bag...