अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसघोर : ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा
(मुंबई, संदीप गंगासागरे) अंधेरी पूर्व एमआयडीसी तील शेकडो ताबाधारकांना घुसखोर ठरविल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. तसेच चारशेच्यावर सदनिकाधारक अद्यापही घरांपासून वंचित आहेत, त्यांना सदनिकांचा ताबा मिळाला नाही तर येत्या काही दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे अध्यक्ष संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डाॅ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदना द्वारे दिला आहे. अंधेरी पूर्व एमआयडीसीतील ताबाधारकांना विकासकानेच ताबा पत्र दिलेली आहेत. चावी सह करारनामाही देण्यात आले शिवाय इमारतीच्या बाहेर बाउंसर बसवले असतांना, त्यांना घुसखोर कसे काय म्हणता येईल? असा सवाल पॅन्थर डाॅ. राजन माकणीकर यांनी उपस्थित केला आहे. २३९ ताबाधारक आहेत. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतरच त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असताना एमआयडीसी कार्यालयातून त्यांनाच घुसखोर ठरविण्यामागे काय हेतू असावा ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एसआरए योजनेतील अद्यापही चारशे सदनिकाधारक हे मालकी घरापासून वंचित आहेत. याच एसआरए...