गवळी समाज संघटना तर्फेगुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न
नांदेड (प्रतिनिधी) –नांदेड येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आज दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला. या शिबिरात उपस्थित गवळी समाजातील जवळपास १०० विधार्थी, विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह , श्रीमद भागवत गीता आणि पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद सीताराम मंडले तर प्रमुख अतिथी म्हणून दीक्षा अकॅडमीचे संचालक लक्ष्मीशंकर यादव, नांदेड विद्यापीठातील डॉ कैलाश यादव , नेहरू स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. ममता यादव, सहायक सरकारी अभिवक्ता सौ. प्रसन्ना रौत्रे , सी. ए. अखिलेश मंडले, ऍड हरिकिशन मंडले उपस्थित होते . यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षा मित्र सुशांत यादव व दीपक यादव यांनी आतापर्यंत संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली तदनंतर डॉ. कैलाश यादव यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देऊन नांदेड विद्यापीठात उपलब्ध असलेल्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, डेटा...