Posts

Showing posts from October, 2023

नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात ( Government Hospital) चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे. हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 12 नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. दरम्यान ...