Posts

Showing posts from June, 2026

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कापूस बियाण्याचे वितरण

Image
भोकर: (संदिप गंगासागरे) केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील धावरी बू. ता. भोकर येथील नोंदणीकृत शेतकरी गटांची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी गटांना नुकतेच अधिकृत कापूस बियाणे बॅग आणि तांत्रिक निविष्ठांचे वाटप करण्यात आले.  हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. दिलीप जाधव, मंडळ कृषि अधिकारी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी टोंपे साहेब,उप कृषी अधिकारी श्री. रवी तांडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री. चंद्रशेखर इरलेवाड यांनी आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर प्रकाश टाकला.  अधिकारी वर्गाचे प्रमुख मार्गदर्शन: आधुनिक पद्धतींचा वापर: सघन कापूस लागवड (HDPS) पद्धतीचा अवलंब करून मर्यादित क्षेत्रात जास्त आणि दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे, याचे प्रात्यक्षिक समजावून सांगण्यात आले. स्वच्छ कापूस वेचणी: कापसाची प्रत उत्तम राखण्यासाठी आणि बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष वेचणी पिशव्यांचा (Picking Bag...

भोकर म्हैसा मार्गावर दोन भीषण अपघात; अंगणवाडी सेविका व युवकाचा जागीच मृत्यू

Image
भोकर (संदिप गंगासागरे) : भोकर–म्हैसा राज्य मार्गावर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांमध्ये एका अंगणवाडी सेविकेसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही अपघात इतके गंभीर होते की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव कारच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी अंत खडकी ता. भोकर येथील अर्चना गोविंद शिंदे (वय अंदाजे 31 वर्षे) या अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत होत्या. भोकर–म्हैसा मार्गावरील नागपूर पाटी ते चिंचाळा पाटी दरम्यान त्या आपल्या एमएच 26 सीडब्ल्यू 1961 क्रमांकाच्या स्कुटीवरून जात असताना एमएच 41 एटी 1819 क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडकेनंतर कारने स्कुटीसह अर्चना शिंदे यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच स्कुटीचा पूर्ण चकणाचूर झाला. त्यांच्या पश्चाता नवरा, एक मुलगा, एक मुलगी असल्याचे समजते तर या घटनेने खडकी परिसरासह अंगणवाडी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.हा अपघात दुपारी दोन ते अडीच दरम्यान झाला तर पोमनाळा–सोनारीदर...

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : भोकर तालुक्याचा नंबर कधी लागणार याकडे जनतेचे लक्ष

Image
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई  नांदेड दि. 2 जून :- सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ व इतर अन्नपदार्थांवर, साठ्यांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडण्यात आली आहे.  प्राप्त गोपनीय माहिती व नियमित तपासणीच्या आधारे शुक्रवार 29 मे 2026 रोजी मे. एम.ए. शरीफ जुना मोंढा नांदेड या आस्थापनेची तपासणी करून आस्थापनेतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 718 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 14 हजार 880 किंमतीचा अन्न पदार्थ कायद्याचे उल्लघंन करत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे.  शनिवार 30 मे 2026 रोजी मे. रॉयल बेकरी, धनेगाव, ता.जि. ...