जेष्ठ पत्रकार रमेश गंगासागरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्त्रीय पुरस्काराने सन्मानित
आदिलाबाद (प्रतिनिधी) संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती तेलंगानातील आदिलाबाद येथे रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी मोठया हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. या जयंती मध्ये जयंती मंडळाच्या वतीने तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या तेलंगानातील मान्यवरासह नांदेड व नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा l तेलंगणा सरकारचे माजी मंत्री श्री जोगू रामन्नाजी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्र मधून नांदेड येथिल इंजी. तथा साहित्यिक भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, भोकर येथिल जेष्ठ पत्रकार तथा अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे ता. अध्यक्ष रमेश जी. गंगासागरे, अर्धापूर येथिल पत्रकार सोनटक्के यांचा समावेश आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगाना यांच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आदिलाबाद येथील गुरु रविदास समाज मंदिरामध्ये राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या ...