छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती अभियान
भोकर येथील कै.दिगंबरराव बिंदू महाविद्यालय येथे आज दिनांक 8.8.2023 रोजी तहसील कार्यालय भोकर व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत "मतदार जनजागृती अभियान"आयोजित करण्यात आले होते. मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भेटीबाबत मा.राजेश लांडगे
तहसीलदार भोकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणी किती आवश्यक आहे याचे महत्व विषद केले.
नवमतदारांची नावनोंदणी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.काळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रशांत टाके, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.महाविद्यालयातील पात्र नवमतदारांचे मोबाईल ॲप द्वारे नाव नोंदणी करण्यात आली व नमुना नं 6 भरून घेण्यात आले.यावेळी श्री. निलेश पळसकर नायब तहसीलदार,जी.के शेळके अव्वल कारकून, डी.जी.कावळे महसूल सहाय्यक हे उपस्थित होते. तर मोबाईल ॲपद्वारे नावनोंदणी साठी निवडणूक विभागाचे ऑपरेटर सूर्यवंशी व त्या विभागातील बीएलओ रवी महाबळे,जावेद इनामदार,संतोष सुंकरवार यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment